Ad will apear here
Next
ब्रिजस्टोन इंडियाच्या सहकार्याने हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळेची उभारणी
इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक सुविधा
इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये हिस्टोपॅथलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अजय सेवेकरी, संजय देशमुख आदी

आळंदी : ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने ब्रिजस्टोन इंडिया, या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने आळंदीजवळ असलेल्या इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये  हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळा उभारण्यास सहकार्य केले आहे. ब्रिजस्टोन इंडियाचे संचालक अजय सेवेकरी, इंद्रायणी हॉस्पिटलचे विश्वस्त व्यवस्थापक संजय देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतेच या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.  

या उपक्रमाबाबत ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले, ‘लोकांसाठी चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून समाजाप्रती असलेली आपली वचनबद्धता जपण्याला ब्रिजस्टोनने नेहमीच प्राधान्य दिले आहे. दुर्गम ग्रामीण भागात राहणाऱ्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी यासाठी आम्ही काही आरोग्य संघटनांसोबत काम करत आहोत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उत्तम उपचार मिळणे आजही अनेकांकरिता कठीण आहे. त्यामुळे सर्व रुग्णांकरिता चांगले उपचार आणि सेवा पुरविण्याची कास धरलेल्या इंद्रायणी हॉस्पिटलला साह्य करताना आम्हाला आनंद होत आहे.’

या हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळेत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा असून, यामुळे तातडीने निदान करणे आणि उपचार करणे शक्य होणार आहे; तसेच खर्चातदेखील बचत होणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZZMCF
Similar Posts
पुण्यातील डॉ. सुमित शाह यांना राष्ट्रीय पुरस्कार पुणे : पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमित शाह यांना ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट ऑफ द इयर-२०१९’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या ‘ग्लोबल हेल्थकेअर एक्सलन्स अॅवॉर्डस् अँड समिट’ या कार्यक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व पद्मश्री डॉ
आषाढी वारीसाठी ‘माऊली विठ्ठलयात्रा’ अॅपची निर्मिती पुणे : वारीसोबत वारकऱ्यांचे सामान घेऊन चालणाऱ्या वाहनांना एका विशेष पासचे वाटप करण्यात येणार आहे. ही वाहने कुठेपर्यंत आलेली आहेत वा वाहतूक कोंडीत अडकली आहेत हे कळण्यासाठी ‘माऊली विठ्ठलयात्रा’ या मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
वर्ल्ड स्किल स्पर्धेत ‘एमआयटी’च्या दोन विद्यार्थ्यांना पदक पुणे : रशियातील कझान शहरात झालेल्या ४५ व्या वर्ल्ड स्किल स्पर्धेत ‘एमआयटी’च्या रोहन हनागी व ओंकार गुरव या विद्यार्थ्यांनी मोबाइल रोबोटिक्स विभागात मेडल ऑफ एक्सलन्स पटकावले.
रोबोटिक सर्जरीने मूत्रपिंडातील ट्यूमर काढण्यात यश पुणे : रोबोटिक सर्जरीच्या मदतीने एका ५५ वर्षीय गृहस्थांच्या मूत्रपिंडात असलेला मोठा ट्यूमर काढण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे या व्यक्तीचे मूत्रपिंड वाचवणे शक्य झाले असून, तीव्र पोटदुखीपासून त्यांची मुक्तता झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language